Manoj Jarange on Reservation : आता गोरगरीब सत्ताधाऱ्यांना खुर्ची देणार नाही- मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange on Reservation : आता गोरगरीब सत्ताधाऱ्यांना खुर्ची देणार नाही- मनोज जरांगे
राजरत्न आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांची घेतली भेट  महाविकास आघाडी, महायुतीला लोक वैतागले आहेत... राजरत्न आंबेडकर   सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांची प्रतिक्रिया...  गोरगरीब सामान्य लोकं विधानसभेत गेले पाहिजे: राजरत्न आंबेडकर   आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत, आमच्या अजून बऱ्याच चर्चा बाकी आहेत, जरांगे यांच्या सोबतच्या भेटीनंतर राजरत्न आंबेडकर यांची प्रतिक्रिया...  अँकर*: महाविकास आघाडी, महायुतीला लोक वैतागले आहेत, त्यामुळे सत्ता परिवर्तन व्हायला पाहिजे अशी प्रतिक्रिया राजरत्न आंबेडकर यांनी दिलीय. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनतर ते माध्यमांशी बोलत होते. महायुती हटवली तर महाविकास आघडी येते, महाविकास आघाडी हटवली तर महायुती येते असं म्हणत सत्ता परिवर्तन झालं पाहिजे असं राजरत्न आंबेडकर म्हणालेत. गोरगरीब सामान्य लोकं विधानसभेत गेले पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवलीय. आम्ही महाराष्ट्रात समीकरण घडवून आणत आहोत असं सांगत आमच्या अजून बऱ्याच बैठका बाकी आहेत असं देखील राजरत्न आंबेडकर म्हणाले आहेत. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram