Manoj Jarange : विधानसभा जवळ आली आहे... मनोज जरांगे यांचा सर्व आमदारांना इशारा ABP Majha

Continues below advertisement

जालना: राज्यातील मराठा समाजाला सगेसोयरे व्याख्येत बसणारे आरक्षण लागू व्हावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे शनिवारपासून पुन्हा एकदा एल्गार करणार आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण करणे टाळले होते. मात्र, ही आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर मनोज जरांगे यांनी 4 जूनपासून पु्न्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, नंतर ही तारीख बदलून 8 जून करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी (Jalna Police) कायदा-सुव्यवस्थेचे कारण पुढे करत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारली होती. परंतु, मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. 

पोलिसांच्या परवानगीशिवाय मनोज जरांगे आता आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. आज सकाळी दहा वाजता सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसतील. यानंतर आता पोलीस त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणस्थळावरुन रुग्णालयात नेण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मराठा  आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीमारात अनेक आंदोलक जखमी झाले होते. तेव्हापासून खऱ्या अर्थाने मनोज जरांगे हे प्रकाशझोतात आले होते आणि आंतरवाली सराटी (antarwali sarati ) येथील त्यांचे आमरण उपोषण मराठा आरक्षण आंदोलनाचे (Maratha Reservation agitation) केंद्र झाले होते. हा अनुभव लक्षात घेता पोलीस आता मनोज जरांगे यांच्याविरुद्ध काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram