Manoj Jarange On Girl Education : शिक्षणाची आश्ववासनं देऊन मुलींना फसवू नका : मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange: राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा तिढा गंभीर स्वरूप घेताना चे चित्र असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Jarange) यांच्यासह फडणवीसांवर जोरदार टीका केलीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) यांच्या सांगण्यावरून प्रवीण दरेकरांनी 12 ते 13 संघटना जमा केल्या, असा आरोप जरंगे यांनी केला. मराठ्यांचा विरोधात उगाच बोंबलायचं असं त्यांना सांगितलं असं म्हणत जरांगे यांनी दरेकरांवर निशाणा साधला. पुढचे दोन-तीन दिवस थांबा सगळा स्पर्धा फास्ट होईल असेही ते म्हणाले. 

मराठ्यांची एकजूट चळवळ बदनाम केली जात आहे. काही जणांचे दुकान बंद झाले तरी वर्ष वर्ष त्यांना झोप येत नाही. त्यांना दरेकरांच्या माध्यमातून संधी सापडली असं म्हणत आपण उगाच इकडून तिकडं पळून देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न साकार करायचं हे काम करायचं नाही. अशी सणसणीत टीका जरांगे यांनी दरेकरांसह फडणवीसांवरही केली. 

दरेकर फडणवीस तुम्हाला वाचवणार नाहीत-मनोज जरांगे 

दरेकर फडणवीस तुम्हाला वाचवणार नाही असं म्हणत आपण त्यांच्या दारात कशाला जायचं सरकारची नोकर आहेत का ? असा सवाल करत दरेकर च्या माध्यमातून फडणवीस यांनी रचलेला हा डाव आहे. मराठा समाज जाब विचारायला खंबीर आहे. अजून मुंबईला जायचं आहे. तुम्ही उगाच दरेकर आणि फडणवीस चा ऐकून यात पडू नका असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले. 

दरेकरांनी 12- 13 संघटना केलात जमा 

फडणवीसांच्या सांगण्यावरून दरेकरांनी 12 ते 13 संघटना जमा केल्याचे मनोज जरांगे म्हणाले. मराठा समाजाच्या विरुद्ध बोलण्यासाठी त्यांना सांगितलं असा आरोप करत दोन-तीन दिवसात पर्दाफाश होईल. फडणवीस दरेकरांच्या माध्यमातून मला उघड पाडायचा ट्रॅप रचतोय. त्यामुळे दरेकर च्या अभियानात कोणीही सहभागी होऊ नये असा आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केले.

दरेकरांसोबत आणखी बरेच लोक जाणार आहेत. दरेकरांना सामील होणाऱ्या मराठा बांधवांना यांनीच बदनाम केलं आहे. यांना चर्चेला बोलवायचं, दार लावून घ्यायचे आणि यांनीच व्हिडिओ तयार करायचे. बंद दारा चर्चा सुरू आहे असं सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा. हा सगळा फडणवीसांचा डाव आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram