Manoj Jarange -Chhagan Bhujbal:शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील पण..जरांगेंचं टीकास्त्र

Continues below advertisement

Manoj Jarange -Chhagan Bhujbal:शांतता रॅली भंग करण्याचा प्रयत्न भुजबळ करतील पण..जरांगेंचं टीकास्त्र मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची शनिवारपासून शांतता रॅले सुरु होणार आहे. त्यापूर्वीच राज्यसरकार अॅक्शनमोडवर आलं आहे. येत्या सोमवारपासून  शिंदे समिती हैदराबादच्या दौऱ्यावर जाणार आहे. शिंदे समितीचा हा 4 दिवसांचा हैद्राबाद दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिंदे समिती मनोज जरांगेंच्या हैदराबाद गॅझेटच्या  मागणीबाबत पुरावे गोळा करण्यात येणार आहेत. या कामात मदत करावी अशी विनंती राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी तेलंगणाच्या मुख्य सचिवांना पत्र देऊन केली आहे. 13 जुलैपर्यंत सरकारने सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली नाही तर 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे.  मराठा आंदोलक मनोज जरांगे प मराठवाडा दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीतून रवाना झालेत. आज मनोज जरांगे पाटील हिंगोली दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत हिंगोलीत आज मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली निघणार आहे. 
एकटाच्या लढण्यात आणि करोडोंच्या लढण्यात खूप शक्ती असेत, त्यामुळे मराठा समाजाने या शांतता रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जरांगे यांनी केलंय. आंदोलक म्हणून आशा बाळगणे माझे कर्तव्य असून आम्ही 13 तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून असल्याचं जरांगे म्हणालेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासह अंतरवाली सराटी मधील सर्व गुन्हे मागे घेतील असा आम्हाला विश्वास असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. राजकीय इच्छा शक्ती असली तर 7 दिवस नाही, 2 घंट्यात कायदेशीर टिकणारे निर्णय होऊ शकतात असं जरांगे यांनी सरकारला उद्देशून म्हटलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram