Manoj Jarange on Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन ओरबाडलं, छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगेंचे आरोप
Continues below advertisement
Manoj Jarange on Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन ओरबाडलं, छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगेंचे आरोप
मनोज जरांगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याची सांगता बीडमध्ये झाली. धोंडराई इथे झालेल्या सभेत जरांगेंनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधला. महाराष्ट्र सदनचे, गोरगरिबांचे पैसे कोणी खाल्ले हे मला माहित आहे, असं जरांगेंनी म्हटलं. तसंच यापूर्वी वैचारिक मतभेद होते, मात्र आता जातीमध्ये मतभेद निर्माण करत असल्यामुळे व्यक्ती म्हणूनही विरोध आहे, असं जरांगे भुजबळांना उद्देशून म्हणाले.
Continues below advertisement