Manoj Jarange Nashik Daura : मनोज जरांगे आज छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Nashik Daura : मनोज जरांगे आज छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात
Manoj Jarange In Nashik : मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) निघालेल्या अध्यादेशानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. याच दौऱ्यादरम्यान आज मनोज जरांगे (Manoj Jarange) छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) बालेकिल्ल्यात धडकणार आहेत. जरांगे हे आज नाशिक (Nashik) जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत. विशेष म्हणजे याच दौऱ्यात मराठा समाजाच्या वतीने ठिकठिकाणी जरांगेंचे जल्लोषात स्वागत करत जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले जाण्याची शक्यता आहे. याच दौऱ्यात मनोज जरांगे हे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शनही घेणार आहे. त्यामुळे जरांगे यांचा आजचा नाशिक दौरा चर्चेत आला आहे.