Manoj Jarange Mumbai March : मनोज जरांगेंची आज अहमदनगरमध्ये, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Continues below advertisement

Manoj Jarange Mumbai March : मनोज जरांगेंची आज अहमदनगरमध्ये, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) शनिवारी मुंबईच्या (Mumbai) दिशेने निघाले असून, त्यांच्या पायी दिंडीचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, आज निघणाऱ्या पायी दिंडीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. 26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा, मुंबईत येऊ नका असे म्हणत दादागिरीची भाषा करू नयेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल, असे म्हणत जरांगे यांनी आज पुन्हा सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की,"संविधान हातात घेऊ नयेत, यावर तोडगा कसा काढता येईल, सत्ता येत असते जात असते. मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल होणार आहे. आम्ही आमच्या मागणीवक्र ठाम आहे. आमच्या नोंदी सापडल्या आहेत. त्यांना मराठ्यांची ताकद पहायची असेल. मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहेत. दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नयेत. मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात, दादागिरीची भाषा करू नयेत.  26 जानेवारीच्या आधी तोडगा काढा," असा इषारा जरांगे यांनी दिला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram