Manoj Jarange : आरक्षणाच्या केंदरस्थानीच नोंदी नाहीत,मनोज जरांगेंच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद नाही
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद नाही, अंतरवाली गावातही एकही नोंद नाही.. कुणबी नोंदी आणि अंबड ताल
मनोज जरांगे हे गेल्या चार महिन्यापासून मराठा आरक्षणाचा लढा लढत आहेत. त्याच्या लढयामुळे महाराष्ट्रात 54 लाख कुणबी नोंदी मिळाल्याचा दावा सरकारने केला. पण अद्याप मनोज जरांगे यांच्या स्वतःच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद सापडलेली नाहीये. एवढंच नाही तर जे गाव मराठा आरक्षण लढ्याचं केंद्रस्थान बनलंय, त्या अंतरवाली सराटी गावात देखील एकही कुणबी नोंद आढळलेली नाही. अधिक धक्कादायक म्हणजे जरांगेंचं मूळगाव, म्हणजेच बीड जिल्ह्यातील मातोरी गावातही नोंद सापडलेली नाही. त्यामुळे आज तरी जरांगे कुटुंब ,मूळ गाव आणि आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू असलेलं गाव आरक्षणापासून वंचित आहे. दरम्यान, जरांगे आपल्या भाषणात नेहमी गोदाकाठच्या १२३ गावांचा उल्लेख करतात. यातील ५९ गावं जालना जिल्ह्यात येतात. यातील केवळ एका गावात नोंदी आढळल्या आहेत, आणि त्यांची संख्या देखील केवळ दोन इतकी आहे. त्यामुळे, जरांगेंच्या आंदोलनाची महाराष्ट्राला वळसा, मात्र काखेतच नाही कळसा, अशी अवस्था झाल्याची चर्चा रंगलीय.