Manoj Jarange Maratha Reservation : मराठा समाजाने पाठिंबा द्यायचे उमेदवार, मतदार संघ 3 तारखेला जाहिर करणार

Continues below advertisement

Manoj Jarange Maratha Reservation :  मराठा समाजाने पाठिंबा द्यायचे उमेदवार, मतदार संघ 3 तारखेला जाहिर करणार

हेही वाचा : 

भारतीय जनता पक्षाने मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून शायना एनसी यांना उमेदवारी दिली आहे. तर शायना एनसी यांच्याविरोधात काँग्रेस पक्षाने  अमिन अमीरअली पटेल पुन्हा एकदा मैदानात उतरवलं आहे. दरम्यान, निवडणुकीच्या प्रचार करत असताना ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांनी शायना एनसी यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. "त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.” असं खासदार अरविंद सावंत म्हणाले होते. त्यानंतर शायना एनसी चांगल्याच संतापल्या. त्यांनी पोलीस ठाण्यात या वक्तव्यावरुन तक्रार दाखल केली आणि अरविंद सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला.   बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं : एकनाथ शिंदे   दरम्यान, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, शायना एनसीबाबत जे विधान केलंय त्यांचा निषेध करतो. बाळासाहेब असते तर अशा नेत्यांचं थोबाड फोडलं असतं. लाडक्या बहिणीच्या बाबत असं विधान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी अरविंद सावंतांना सुनावलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram