Manoj Jarange Latur Speech : आमच्या समाजाचे 16 टक्के आरक्षण भुजबळांनी घेतलं
Manoj Jarange Latur Speech : आमच्या समाजाचे 16 टक्के आरक्षण भुजबळांनी घेतलं सरकार फक्त खोटं आश्वासन देत वेळ मारून नेत आहे. यांचे डाव आम्ही ओळखले आहेत. त्यामुळेच मराठा समाजाचा रोष आता रस्त्यारस्त्यावर दिसत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) आणि भाजप मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करत आहेत, आता फक्त संघर्ष होणार असल्याचे वक्तव्य मराठा आंदोलन मनोज जरंगे पाटील यांनी लातूरमध्ये व्यक्त केले आहे. आज मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी मराठा आंदोलन मनोज जरांगे यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाज लातूरच्या रस्त्यांवर उतरला आहे. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन मराठा ओबीसीत निर्माण करताहेत तेढ- मनोज जरांगे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने ते गिरीश महाजन हे मराठा व ओबीसी समाजात तेढ निर्माण करत असून यांचा डाव आम्ही ओळखला आहे. याची माहिती समाजाला आहे. त्यामुळे आता फक्त संघर्ष होणार असल्याचा इशारा जरांगे यांनी केला. लातूर शहरात अडीच लाखांहून अधिक मराठा समाज रस्त्यावर मराठा आरक्षणाविषयी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आज लातूर शहरात आहेत. मराठा आरक्षण शांतता रॅलीसाठी लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील अडीच लाखांहून अधिक मराठा समाज शहरात दाखल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शहरात या शांतता रॅलीचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. शहरात काही ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील रॅलीसाठी 2000 पुरुष स्वयंसेवक आणि 400 महिला स्वयंसेवकांची फळी सज्ज ठेवण्यात आली होती.