Manoj Jarange Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत मोठा भाऊ म्हणून मराठा समाज पुढाकार घेणार?

Continues below advertisement

Manoj Jarange Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत मोठा भाऊ म्हणून मराठा समाज पुढाकार घेणार?  राज्याचे राजकारण सध्या आरक्षणाच्या (Reservation) मुद्द्याला घेऊन अक्षरक्ष: ढवळून निघाले आहे. अशातच लातूर शहरात मागील 12 दिवसापासून धनगर समाजाच्या दोन तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. धनगर समाज (Dhangar Reservation) अनुसूचित जमातीच्या अंमलबजावणी करावी, या मागण्यासाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात त्यांनी उपोषणाचे हत्यार उगारले आहे. मात्र, उपोषणासाठी बसलेल्या या दोघा तरुणांची प्रकृती खालावली आहे. आमरण उपोषणास बसलेल्या चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे.  परिणामी, त्यांची विचारपूस करण्यासाठी म्हणून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आज उपोषण स्थळी दाखल झाले आहेत. सर्वप्रथम त्यांनी या भागातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी उपोषण स्थळी भेट दिलीय. यावेळी मराठा धनगर एकजुटीचा विजय असो, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्यात.   बारा दिवस झाले, मात्र पालकमंत्री अद्याप फिरकले नाहीत लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे बारा दिवस झाले उपोषण सुरू होऊन इकडे फिरकले नाहीत. त्यांच्यापर्यंत विषय गेला होता, तरी ते इथे आले नाहीत. अशी माहिती त्यांना ज्यावेळेस मिळाली. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की, मी इथे राजकारण करण्यासाठी आलो नाही. कुणी जर आमरण उपोषण करत असतील तर त्यांच्या वेदना मला माहित आहेत. मराठा आणि धनगर समाज याच्या मध्ये वाद नाही. राजकारणी ते लावत असतात. हा विषय गंभीर आहे. गिरीश महाजन साहेबांनी येथे नक्कीच भेट द्यावी. उपोषणकर्त्यांचं काय म्हणणं आहे, ते ऐकून घ्यावं. असे मत मनोज जरांगे पाटील यांनी बोलताना व्यक्त केलंय  सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी - मनोज जरांगे पाटील जो मार्ग सत्य असेल त्यात आम्ही आपल्या सोबत आहोत. समाजाच्या न्याय, हक्काच्या मागण्यासाठी पुढे आलेच पाहिजे, असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या मागण्या काय आहेत तो विषय समजावून घेतला. हे संपूर्ण निवेदन वाचून घेतो आणि मग यावर आपण सविस्तर बोलू, असे ही त्यांनी यावेळी सागितले. काही काळजी करू नका, सगळा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहील. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.  सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर राजकारणी हे जाती जातीत तेढ निर्माण करत असतात. आपण काही राजकारणी नाहीत. आपण आपल्या समाजासाठी, लेकरा बाळाच्या भविष्यासाठी काम करत असतो. धनगर समाजाच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करायलाच पाहिजे. सत्तेत येण्यापूर्वी सत्ता आल्याबरोबर धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता मागील दहा वर्षापासून झाली नाही. आमरण उपोषण करण हा डेंजर प्रकार आहे. सरकारनं या लेकरांची काळजी घेतली पाहिजे. असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram