Manoj Jarange Jalna : मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण मागे; उपोषण सोडताना काय म्हणाले?
Manoj Jarange Jalna : मनोज जरांगे यांच्याकडून उपोषण मागे; उपोषण सोडताना काय म्हणाले?
Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जालन्यातील अंतरवाली सराटीत सुरू केलेले आमरण उपोषण स्थगित केले आहे. नारायणगडाचे मठाधिपती आणि गावातील महिलांच्याहस्ते ते उपोषण सोडलं आहे. ज्यूस पिऊन त्यांनी हे उपोषण सोडले असून तब्येत ढासळल्याने आमरण उपोषण स्थगित केल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांना गावकऱ्यांनी आणि समर्थकांनी उपोषण मागे घेण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, आज सकाळीच तब्येत ढासळल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेत असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना दिली होती. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही यावेळी बोलताना जरांगे (Manoj Jarange) म्हणाले, मी उपोषण करायला तयार आहे. मात्र, गावकऱ्यांनी उपचार घेण्यासाठी पाणी पिण्यासाठी किंवा सलाईन लावण्यासाठी आग्रह करायचा नाही. विना उपचार घेता आणि सलाईन न लावता मी मरेपर्यंत उपोषण करायला तयार आहे. सलाईन लावून मी उपोषण करायला तयार नाही. खोटं आणि बेगडी उपोषण मी करणार नाही. उपचार बंद करा मी उपोषण करायला तयार आहे, असंही जरांगेंनी पुढे म्हटलं आहे. तर सलाईन लावून पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं असंही जरांगेंनी म्हटलं आहे.