Manoj Jarange Hunger Strike : अध्यादेशाचा लाभ होत नाही तोपर्यंत उपोषण, मनोज जरांगे पुन्हा मैदानात
Manoj Jarange Hunger Strike : अध्यादेशाचा लाभ होत नाही तोपर्यंत उपोषण, मनोज जरांगे पुन्हा मैदानात
मनोज जरांगे पाटील आजपासून पुन्हा उपोषणाला बसणार, सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा मराठा समाजाला लाभ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, जरांगेंचा इशारा. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ९ फेब्रुवारीला पंधरा दिवस पूर्ण झाले. मात्र अद्याप सगेसोयरे या अध्यादेशाची अंमलबजावणी न झाल्याने आजपासून पुन्हा एकदा मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहेत.जोपर्यंत सरकारने काढलेल्या अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा देखील जरांगेंनी दिलाय. आज सकाळी 10 वाजल्यापासून मनोज जरांगे आंतरवली सराटीला उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी ते गोदापट्ट्यातील आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील चौथ्यांदा उपोषणाला बसणार आहेत.