Manoj Jarange Hunger Strike : मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस, प्रकृती खालावली

बातमी मनोज जरांगे यांच्या उपोषणाची... जालन्यातील अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं उपोषण सुरु आहे.. आज उपोषणाचा सहावा दिवस आहे...  मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून डॉ़क्टरी उपचारांना जरांगेंनी मनाई केलीए.. मात्र काल तब्येत बिघडल्यानं जरांगेंना सलाईन लावण्यात आली होती.. पण जरांगेंनी सलाईन काढून टाकली... जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केलीय... दरम्यान मराठा आरक्षणासाठी सरकारनं काढलेल्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केलीय...
आणि पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करण्याचा इशारा दिलाय... त्यामुळं सरकार जरांगेंच्या उपोषणात मध्यस्थी करणार का?  की  जरांगे पाटील पुन्हा मुंबईत येऊन आंदोलन करणार हेच पाहावं लागेल

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola