Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनस्थळासह, घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी होत असल्याचा दावा

Continues below advertisement

Manoj Jarange : जरांगेंच्या आंदोलनस्थळासह जरांगेंच्या घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी होत असल्याचा दावा मराठा आरक्षण आंदोलनाचा सध्याचा राज्यातील प्रमुख चेहरा असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यावर पाळत ठेवली जात आहे का, अशी शंका आता उपस्थित झाली आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या अंतरवाली सराटी गावातील सरपंचांच्या घरी तळ ठोकून बसले आहेत. मात्र, सोमवारी मध्यरात्री  मनोज जरांगे यांचा मुक्काम असलेल्या  घरावर एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. त्यामुळे मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी (Antarwali Sarati) येथील आंदोलनस्थळ आणि ते राहत असलेल्या घराची ड्रोनद्वारे (Drone) टेहळणी सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या प्रकरामुळे अंतरवाली सराटीच्या ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.  सोमवारी मध्यरात्री एक Drone मनोज जरांगे यांचा मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: गच्चीवर जाऊन पाहणी केली. यानंतर त्यांनी सहकाऱ्यांशी चर्चाही केली.  या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थांनी पोलिसांना तोंडी तक्रार दिली आहे. आता पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची शक्यता आहे. चार दिवसांपूर्वीच अंतरवाली सराटीत अशाचप्रकारे ड्रोन घिरट्या घालताना दिसून आला होता.   यापूर्वी जायकवाडी धरणाच्या परिसरातही असाच ड्रोन फिरत असल्याचे दिसून आले होते. अंतरवाली सराटी हे गाव त्याच टप्प्यात येते. अंतरवाली सराटीपासून पैठण धरणही काही अंतरावर आहे. त्यामुळे जायकवाडी परिसरात फिरणारा ड्रोन आणि आंतरवाली सराटीतील ड्रोन एकच आहे का, याची पोलिसांकडून माहिती घेतली जाऊ शकते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram