Manoj Jarange Full PC : सरकारने बेईमानी केली तर त्यांना गुडघ्यावर आणू - मनोज जरांगे
Manoj Jarange Full PC : सरकारने बेईमानी केली तर त्यांना गुडघ्यावर आणू - मनोज जरांगे
राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. या निवडणुकीत महायुतीला 236 तर मविआला अवघ्या 49 जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत भाजप पक्षाला ऐतिहासिक असे यश मिळाले आहे. भाजपने एकट्याने 288 पैकी 132 जागांवर विजय मिळवला आहे. तर लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या काँग्रेस पक्षाला अवघ्या 16 जागांवर विजय मिळाला आहे. लोकसभा निवडणुकीत फक्त एक उमेदवार निवडून आलेल्या अजित पवार गटाने मोठी मुसंडी मारत विधानसभेला 41 जागा निवडून आणल्या आहेत. तर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक स्ट्राईक रेट असणाऱ्या शरद पवार गटाला अवघ्या 10 जागांवर विजय मिळाला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अवघ्या 20 जागांवर विजय मिळाला.
या निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीवर आणि पॅटर्नवर नजर टाकल्यास अनेक रंजक गोष्टी पाहायला मिळतात. अजित पवार यांच्या पक्षाला राज्यात सर्वाधिक कमी मतं मिळाली आहेत. तरी अजित पवार गटाने 41 जागांवर उमेदवार निवडून आणण्याची कमाल करुन दाखवली आहे. तर अजितदादा गटापेक्षा तब्बल 22 लाख मतं जास्त मिळवणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 16 जागा मिळाल्या आहेत.