Manoj Jarange Full PC : तुम्ही चतूर असाल तर; आम्ही महाचतूर आहोत - मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Full PC : तुम्ही चतूर असाल तर; आम्ही महाचतूर आहोत - मनोज जरांगे

हे देखील वाचा

पुण्यात मुसळधार, रस्त्यावर पाणीच-पाणी; रायगड, सांगली, विदर्भातसह या जिल्ह्यात धुव्वादार बसरला

मुंबई/पुणे : राज्यात मान्सूनचे आगमन झाले असून विविध जिल्ह्यात मुसळधारा (Rain) कोसळत आहेत. हवामान विभागाने दिलेले अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही  (Vidarbha) दमदार पावसाने एंट्री करत एकच दाणादाण उडवली आहे. आजपासून पुढील पाच दिवस विदर्भातील जवळ-जवळ सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. त्यानंतर, आज पुणे (Pune), रायगड, सांगली, बेळगाव, गोंदिया जिल्ह्यासंह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला असून शहरातील रस्त्यांवरुन पाणी वाहताना दिसून येते. 

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पुण्यातील विविध परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं दिसून आलं. अनेकांनी लागलीच पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आडोसा घेतला होता. 11 जूनपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपूर्वीही पुण्यात ढगफुटीसदृष्य पाऊस  झाला होता. शहरातील धानोरी, कात्रज, विमान नगर परिसरात पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान  झालं होतं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram