Manoj Jarange Full PC : देव जरी आडवा आला, तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही
Manoj Jarange at Parbhani : परभणी : सोयरे हा शब्द सरकारनंच लिहिलाय, सगे सोयरे या शब्दांमुळे सर्व काही अडकलं आहे, असं मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले. तसेच, आम्ही कुठेही जाहीर केलं नाही, मुंबईत (Mumbai News) जाणार म्हणून त्यांनाच वाटतंय की, आम्ही मुंबईला यावं, असं जरांगे म्हणाले. तसेच, मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळणारचं, असा दावा पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी केला आहे. देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकत नाही, असंही जरांगे म्हणाले आहेत.