Manoj Jarange Full PC : सगेसोयरेंच्या कायद्यावर ठाम; मराठ्यांना फसवलं तर सरकारला सोडणार नाही- जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Full PC : सगेसोयरेंच्या कायद्यावर ठाम; मराठ्यांना फसवलं तर सरकारला सोडणार नाही- जरांगे देशात आरक्षणासाठी ५० टक्क्यांची मर्यादा असल्याने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर केल्याचे वक्तव्य मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केले. गावातील एखाद्या नदीला बारमाही पाणी असेल आणि शेतकऱ्यांना जाण्यासाठी वाट नसेल तेव्हा पर्यायी मार्ग काढावा लागतो. त्यानुसार राज्य मागासवर्ग आयोगाच्या आधारे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण (Maratha Reservation) मिळेल. तर कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांनाही आरक्षण मिळतच आहे. तसेच ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी नाहीत त्यांना सगेसोयरे या निकषाचा वापर करत कुणबी आरक्षणाचा (Kunbi Reservation) लाभ मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजाचा तिहेरी लाभ होणार आहे. ज्यांना कुणबी म्हणून आरक्षण नको त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या स्वतंत्र आरक्षणाचा लाभ घ्यावा, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ते शुक्रवारी अंतरवाली सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram