Manoj Jarange Exclusive : आमच्यातले काही अतृप्त आत्मे सरकारची मदत करताहेत - मनोज जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange Exclusive  : आमच्यातले काही अतृप्त आत्मे सरकारची मदत करताहेत - मनोज जरांगे सभागृहातील गदोराळातून आता जरा धाराशिवमध्ये जावू.. जिथं मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगेंची जनजागृती आणि शांतता यात्रा सुरु आहे.. हिंगोलीतून सुरु झालेली ही शांतता यात्रा परभणी, नांदेड, लातूर करत आज धारशिवमध्ये पोहोचली.. मात्र, धाराशिवला येण्याआधी मनोज जरांगेंनी धनगर आरक्षणासाठी मागील १२ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दोन आंदोलकांची भेट घेतली. धनगर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर उपोषणाला बसले आहेत. या दोघांची प्रकृती खालावली असून त्यांची विचारपूस करण्यासाठी जरांगे उपोषणस्थळी दाखल झाले. यावेेळी मराठा-धनगर एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देखील देण्यात आल्या... त्यानंतर मनोज जरांगे पुढे धाराशिवकडे निघाले.. आणि तिथं त्यांनी धनगर आरक्षणाबाबत महत्वाचं विधान केलं.. धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून मराठा समाज मोठा भाऊ म्हणून पुढाकार घेईल असं जरांगे म्हणाले.. त्यांची शांतता यात्रा आज धाराशिवमध्ये आहे, त्या रॅलीत ते बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram