Laxman Hake VS Manoj Jarange : जरांगे केवळ सनसानाटी निर्माण करतात, लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
Continues below advertisement
मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या हत्येचा कट रचल्याच्या गंभीर आरोपांवरून महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणी बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane), लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'हेने माझी सुपारी दिली, बाकीच्या प्रश्नांवरचं लक्ष विचलित करून स्वतःकडे कॅमेरे खेचून घेणं हा फिरलेलंपणा आहे', अशा शब्दात लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे. दुसरीकडे, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशीची मागणी केली असून, दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, अडीच कोटी रुपयांची सुपारी दिल्याची माहिती समोर येत आहे. या वादामुळे मराठवाड्यातील, विशेषतः बीडमधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पुन्हा एकदा तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement