Manoj Jarange on Fadnavis | आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीस दबाव आणतात, जरांगेंचा आरोप ABP Majha

Continues below advertisement

Manoj Jarange on Devendra Fadanavis: आम्हाला 13 तारखेपर्यंत आरक्षण न मिळाल्याचा दोष सरकारला देऊन उपयोग नाही. सरकारवरचा आमचा विश्वास उडाला आहे असं मी कधीही म्हटलं नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दबाव आणत असतील, असा आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलाय.

दरम्यान, अजित पवार यांच्या पक्षाचे दोन-तीन पालकमंत्री मराठ्यांच्या विरोधात षडयंत्र करत असल्याचा आरोप करत 20 तारखेला आमरण उपोषणा सोबत 288 उमेदवार उभे करायचे की पाडायचे या निर्णयाची तारीख जाहीर करणार असल्याचे देखील ते म्हणाले.

पुन्हा आमरण उपोषण

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीचा शनिवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप झाला. राज्य सरकारच्या वतीने मंत्री शंभूराजे देसाई यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणावेळी त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दोन महिन्यांचा अवधी मागितला होता. मात्र, जरांगे यांनी एका महिन्याची मुदत देत सरकारला 13 जुलैपर्यंत निर्णय घेण्यासाठीची मुदत दिली होती. ती मुदत आता संपली असून मनोज जरांगेंनी 20 जुलैपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram