Manoj Jarange Banner Solapur : सोलापुरातल्या बार्शीत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारणारे बॅनर झळकले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppManoj Jarange Banner Solapur : सोलापुरातल्या बार्शीत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारणारे बॅनर झळकले
सोलापुरातल्या बार्शीत मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारणारे बॅनर झळकले महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आश्वासन देण्यासाठी सांगणार का? यासह विविध प्रश्न मराठा आंदोलक विचारणारे बॅनर मराठा आंदोलक अण्णासाहेब शिंदे यांनी लावले आठ दिवसात या प्रश्नांची उत्तरे न दिल्यास मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर किती दिवसात मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार हे त्यांच्याकडून लिहून घ्या. मनोज दादा यापूर्वी मराठा मुस्लिम वाद, मराठा दलित वाद आणि आता मराठा ओबीसी वाद सुरूय. त्यामुळे आणखी किती जातींशी वैमनस्य घ्यायचे ते सांगा. देवेंद्र फडणवीस यांना हटवताना मराठा असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार पाडून आपण ब्राह्मण असलेल्या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवून मराठा समाजावर अन्याय करणार नाही का?