Manoj Jarange :लोकांचं खाल्ल्यानं ते जेलमध्ये जाऊन आले,लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करू नये-जरांगे

Continues below advertisement

Manoj Jarange :लोकांचं खाल्ल्यानं ते जेलमध्ये जाऊन आले,लोकांच्या भावना भडकवण्याचं काम करू नये-जरांगे

सांगली : छगन भुजबळ यांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मराठा समाजाने आता ठरवले आहे, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. त्यांना तेच काम उरले आहे. लोकांचे खाल्ल्याने ते आतमध्ये जाऊन आले आहेत. कोण कुणाचे खात आहे सर्वांना माहित आहे. त्यामुळे त्यांनी यावर बोलू नाहीत. तुम्ही टीका केली तर, तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाहीत. या राज्यात आम्ही वातावरण खराब होऊ देणार नाही. आता आम्ही देखील 50 टक्के आहे. लोकांचे पैसे खाता, रक्त पिता का? मग तुम्हाला कोण देव मानणार आहे. वयाने तुम्ही मोठे आहेत. आम्हाला काढायला लावू नयेत. आम्ही देखील तुमचा बायोडेटा काढला आहे. धमक्या देऊ नयेत, असे जरांगे म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram