Manoj Jarange : 'हा मोर्चा Ajit Pawar पुरस्कृत, Fadnavis यांनी OBC समाजावर कंट्रोल ठेवावा', मनोज जरांगेंचा हल्लाबोल
Continues below advertisement
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) जीआरविरोधात बीडमध्ये (Beed) ओबीसी समाजाने (OBC Community) मोर्चाचे आयोजन केले आहे, ज्यावर मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी टीका केली आहे. 'हा बीडमध्ये निघणारा मोर्चा सध्यातरी अजित दादा राष्ट्रवादी पुरस्कृत दिसतोय,' असे थेट वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले आहे. या मोर्चावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नियंत्रण असायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली. लोकशाहीत प्रत्येकाला मोर्चा काढण्याचा अधिकार आहे, पण आम्ही याला समोरासमोर विरोध करणार, मागून वार नाही, असेही ते म्हणाले. या मोर्चासाठी मुंडे बंधू-भगिनी आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद आणखी तीव्र झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement