Manoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण, सराटीत परिस्थिती काय?

Continues below advertisement

Manoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?

 मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं यासह  इतर मागणीसाठी  मनोज जरांगे  आजपासून आमरण उपोषणाला बसणार....  मनोज जरांगे पाटील यांच या अंतरवाली सराटीत सातव आमरण उपोषण,   मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह ईतर आठ मागण्यासाठी  मनोज जरांगे  यांच आमरण उपोषण.  अँकर: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर आठ मागण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी  पुन्हा एकदा आमरण उपोषणाच हत्यार उपसलंय ,मनोज जरांगे आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे  त्यांचं  सातवं आमरण उपोषण  असणार आहे. सकाळी 10 वाजता अंतरवाली येथे त्यांचा उपोषणाला सुरवात होणार आहे.. दरम्यान ज्यांना उपोषणात सहभागी व्हायचे त्यांनी सहभागी व्हावं असं अवाहन देखील त्यांनी  केलं आहे.   मनोज जरांगे यांच्या मागण्या    1) महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे...  2) हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर,बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर,लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी...  3) मा. न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे . मा. शिंदे समितीला एक वर्ष मुदत वाढ द्यावी....  4) सगे- सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी आम्ही दिलेल्या व्याख्या प्रमाणे  सगे- सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी...  5) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस सरसकट सर्वांच्याच मागे घेण्यात याव्यात. सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे...  6) सरकारने 10 टक्के sebc आरक्षण लागू केले आणि मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले ते ईडब्लूएस आरक्षण पुन्हा सुरू करावं...  7) कुणबी नोंदी शोधण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ,कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडीटी देण्यासाठी, जिल्हा व तालुकास्तरावर कक्ष स्थापन केले होते ते कक्ष पुन्हा तात्काळ सुरू करण्यात यावे .वंशावळ समिती मोडी लिपी समिती व सर्व भाषेचे अभ्यासक यांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करण्यात यावी...  8) महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग आहे म्हणजेच कुणबी आहे. ओबीसी क्रमांक 83 वर कुणबी आहे. आणि 2004 सालीचा अध्यादेश आहे. म्हणजेच मराठा आणि कुणबी एकच आहे. मराठ्यांची पोटजात -उपजात कुणबी आहे. म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे .हा सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram