Manikrao Kokateकोकाटेंकडे क्रीडा तर, Dattatray Bharne यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देणार- सूत्र

Continues below advertisement
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सभागृहात रमी खेळल्याच्या प्रकरणानंतर माणिकराव कोकाटे यांचे खाते बदलण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटे यांच्याकडील कृषी खाते आता दत्ता भरणेंकडे दिले जाईल. तर दत्ता भरणेंकडे असलेले क्रीडा खाते माणिकराव कोकाटे यांना देण्यात येणार आहे. या संदर्भात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याची माहिती आहे. या घडामोडींवर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे ही आमची प्रामुख्याने शेतकऱ्यांचे पोरं म्हणून मागणी होती," असे घाटगे यांनी म्हटले आहे. कृषी खाते संवेदनशील व्यक्तीकडे असावे अशी त्यांची मागणी आहे. कोकाटे यांना कोणतेही मंत्रीपद देऊ नये अशी भूमिका छावा संघटनेने घेतली आहे. अजित पवारांनी मंगळवारपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन हे राजकीय गणित जुळवले जात असल्याची चर्चा आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola