Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे म्हणाले, सरकार भिकारी...अजित पवारांची अद्याप प्रतिक्रिया नाही
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना अभय मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. राष्ट्रवादी पक्षातल्या एका नेत्याने एबीपी माझाशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. "हल्ली प्रत्येकजण मोबाईल मध्ये व्यस्तच तो म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे," असा सवालही या नेत्याने उपस्थित केला आहे. या माहितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कोकाटे यांच्या वक्तव्यांवरून सुरू असलेला वाद आणि पक्षाची भूमिका यामुळे पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.