Vishva Hindu Parishad :हिंदू मंदिरांचं व्यवस्थापन हिंदू समाजाकडे सोपवावं, विश्व हिंदू परिषदेची मागणी
हिंदू मंदिरं आणि धार्मिक स्थळं सरकारी नियंत्रणापासून मुक्त करुन हिंदू मंदिरांचे व्यवस्थापन हिंदू समाजाला सोपवले पाहिजे, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. हिंदूंनी मंदिरात दान केलेलं धन फक्त हिंदूंच्या कल्याणासाठी वापरलं पाहिजे, ज्यांची हिंदू धर्मावर श्रद्धा नाही, जे हिंदू पूजा पद्धतीला मानत नाहीत, त्यांच्यासाठी हिंदू मंदिरात दान केलेलं हिंदूंचं धन का खर्च करावं असा प्रश्नही विश्व हिंदू परिषदेने विचारलाआहे.