Shoot At Sight: 'नरभक्षक बिबट्याला ठार करा', Forest Department चे आदेश; Pimparakhed मध्ये 5 पथके

Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (Pimparakhed) गावात नरभक्षक बिबट्याने (Man-eater Leopard) तीन जणांचा बळी घेतल्याने मोठी दहशत पसरली आहे. 'जो बिबट्या नरभक्षक आहे त्याला ठार मारण्यात येणार आहे,' असे स्पष्ट आदेश वनविभागाने (Forest Department) दिले आहेत. या आदेशानंतर, नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी किंवा ठार करण्यासाठी पाच विशेष पथके तयार करण्यात आली आहेत, ज्यात दोन शार्प शूटर्स (Sharpshooters) आणि तीन ट्रँक्विलाइझिंग गन तज्ञांचा समावेश आहे. पिंपरखेड गावाच्या दहा किलोमीटरच्या परिसरातील बिबट्यांना प्रथम भूल देऊन पकडले जाईल आणि तांत्रिक तपासणीनंतर नरभक्षक असलेल्या बिबट्याला ठार केले जाणार आहे. परिसरात पंचवीस पिंजरे आणि दहा ट्रॅप कॅमेरे (Trap Cameras) बसवून वनविभाग या बिबट्याचा शोध घेत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola