Mallikarjun Reddy : भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डींची पक्षातून हकालपट्टी

Mallikarjun Reddy : भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डींची पक्षातून हकालपट्टी

"आता कॉम्प्रोमाइज नाही, आता रामबाण निघाला आहे"... भाजपमधून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलेले माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनीही पक्षाला आव्हान देत बंडखोरीची भाषा केली आहे...

भाजपमधून सहा वर्षासाठी निलंबन झालेल्या माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पक्षाला इशारा देत "आता रामबाण निघाला आहे, आता तो थांबणार नाही, आता विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होईल", असं म्हणत मल्लिकार्जुन रेड्डी यांनी ते रामटेक मधून बंडखोरी करतील अशीच भूमिका व्यक्त केली आहे...

पक्षाने त्यांना सहा वर्षासाठी निलंबित केले ही माहिती समजल्यानंतर काही कार्यकर्ते व स्थानिक पत्रकार जेव्हा मल्लिकार्जुन रेड्डी यांना भेटायला गेले.. तेव्हा त्यांनी मी "कोणत्याही स्थितीत कॉम्प्रोमाइज करणार नाही, मी कॉम्प्रोमाईज करणारा नाही" अशी भूमिका व्यक्त केली...

वीस वर्षापासून आशिष जैस्वाल कोणाची तरी मदत घेऊन निवडणूक जिंकत आला आहे, त्याच्यामुळे रामटेक मध्ये भाजप संपत चालली आहे, असा आरोपही मल्लिकार्जुन रेड्डी यांनी यावेळी केला....

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola