Mallikarjun Kharge Congress Lunch : काँग्रेसच्या स्नेहभोजन पंगतीकडे ठाकरे गटाची पाठ
Continues below advertisement
माफी मागायला आपण सावरकर नाही, तर गांधी आहोत, असं वक्तव्य राहुल गांधींनी दिल्लीत केलंं आणि त्याचे राजकीय हादरे इकडे महाराष्ट्रात बसू लागलेत. उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या जाहीर सभेत सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, अशा शब्दांत राहुल गांधींना ठणकावलं. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या संसारात या वादामुळे भांडी वाजतायत की काय?, अशा चर्चा रंगू लागल्यायत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ठाकरे गटाचे खासदार जाणार नाहीत. राहुल गांधींनी सावरकर यांचा अपमान केल्यामुळे ठाकरे गट रुसला असल्याची माहिती आहे. दरम्यान, एकाबाजूला भाजपविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असतानाच, आता सावरकरांच्या मुद्द्यावर महाविकास आघाडीत फुटीची बिजं रोवली जातायत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.
Continues below advertisement
Tags :
Gandhi Delhi Malegaon Apology Congress President Mallikarjun Kharge Savarkar Rahul Gandhi : Uddhav Thackeray 'Maharashtra Political Shock Public Meeting