Malgaon Protest : जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न

Malgaon Protest : जनआक्रोश मोर्चात गोंधळ, मोर्चेकरांचा गेट तोडून न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न 

नाशिकच्या मालेगावमधून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार (Nashik Crime) करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहेया अतिशय हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण गाव हादरलं आहेमिळालेल्या माहितीनुसार, गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनर याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचे डोके दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या (Nashik Crime News) केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मालेगाव तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संशयित आरोपी विजय खैरनार याला ताब्यात घेतले. तर चिमुरडीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी मालेगाव सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या भयावाहघटनेमुळे परिसरात भीती आणि प्रचंड रोषाचे वातावरण पसरले आहे. पोलीस प्रकरणाची अत्यंत गांभीर्याने चौकशी करत आहेत. मात्र आरोपीला कठोरात कठोर कारवाई व्हावीअशी मागणी ग्रामस्थानीं केली आहे.



 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola