Eknath Shinde : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांंचा खळबळजनक दावा, एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासासंदर्भात एक धक्कादायक आरोप समोर आला आहे. या प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंग यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासावेळी त्यांना पंतप्रधान मोदी यांचे नाव घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. “मोदींचं नाव घ्यावं यासाठी दबाव टाकण्यात आला होता,” असे साध्वी प्रज्ञा सिंग म्हणाल्या. या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. याच विषयावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधण्यात आला असून, त्यांच्या प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आरोपांमुळे तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.