Ali Akbar : मल्याळी दिग्दर्शक अली अकबर यांच्याकडून मुस्लीम धर्माचा त्याग ABP Majha

Continues below advertisement

प्रसिद्ध मल्याळी दिग्दर्शक अली अकबर यांनी मुस्लीम धर्माचा त्याग केलाय. सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंतर सोशल मीडियात काही कट्टरतावाद्यांनी आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यामुळे व्यथित झालेल्या अली अकबर यांनी मुस्लीम धर्म सोडण्याची घोषणा केली. आपण हिंदू धर्म स्वीकारणार असल्याचं अली अकबर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.  जनरल रावत यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर काही लोकांनी स्मायली इमोजी टाकत प्रतिक्रिया दिली होती. कट्टरतावाद्यांच्या या प्रतिक्रियांवर टीका करणारा व्हिडीओ अकबर यांनी ट्विट केला. त्यावर आक्षेपार्ह प्रतिक्रिया आल्यानं त्यांचं ट्विटर अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं. त्यानंतर दुसरं अकाऊंट उघडून अली अकबर यांनी मुस्लीम धर्म सोडत असल्याची घोषणा केली. आपलं नवं नाव रामसिंहन असेल असं त्यांनी जाहीर केलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram