Yatra I मालवणमधील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेची तारीख निश्चित I एबीपी माझा
मालवणमधील आंगणेवाडी भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झालीय. देवीने कौल दिल्यानुसार 17 फेब्रुवारी 2020 ला यंदाची यात्रा होणार आहे. आंगणे कुटुंबीयांची मंदिरात बैठक झाल्यानंतर ही तारीख जाहीर करण्यात आलीय. दरवर्षी यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथेप्रमाणे पारध करण्यात आली. देवीला प्रसाद लावण्यात आला. धार्मिक कार्यक्रमानंतर देवीने दिलेल्या कौलानुसार जत्रोत्सवाची तारीख ग्रामस्थांनी जाहीर केली.