Mala Papalkar रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली महसूल सहायक,मालाने स्वीकारला महसूल सहायकपदाचा पदभार
Continues below advertisement
दिव्यांग माला पापळकर यांनी नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक महसूल पदाचा पदभार स्वीकारला. माला पापळकर यांनी दोन हजार तेवीस-चोवीस च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. बत्तीस वर्षांपूर्वी माला जळगावच्या रेल्वे स्टेशनवर बेवारस स्थितीत सापडली होती. तिला अमरावतीच्या वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात आसरा मिळाला. शंकरबाबा पापळकर यांच्या आश्रमात त्यांचे संगोपन झाले आणि त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. त्यांनी MPSC परीक्षा उत्तीर्ण केली. आता त्या नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक टप्प्यांतून पूर्ण झाला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement