Makar Sankranti 2021 | विठुरायाला रंगीबेरंगी फुलांची आकर्षक आरास

Continues below advertisement
मकर संक्रांतीच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मकर संक्रांतीच्या औचित्यावर विठुरायाच्या मंदिराला पुण्यातील भक्ताने आकर्षक फुलांची सजावट केली आहे.नवनाथ भिसे यांच्याकडून विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.झेंडू, अष्टर, शेवंती, कार्नेशन, ऑर्किड, ग्लॅडीओ अशा विविध प्रकारच्या फुलांनी विठ्ठल रुक्मिणी गाभारा, चौखांबी, सोळखांबी सजवण्यात आली आहे. आज संक्रांतीचा राज्यभरातील महिला भाविक देवीला ओवसायाला येत असतात.यंदा कोरोनामुळे ओवसायाला परवानगी नसली तरी या सुंदर फुल सजावटीने प्रत्येक भाविकांचे मन मोहून जात आहे.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram