Solapur Politics: भाजपची 'मेगा भरती', काँग्रेसचे माजी आमदार Dilip Mane मुख्यमंत्र्यांच्या भेटीला!

Continues below advertisement
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी राजकीय भरती झाली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे देखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर पद्माकर काळे, शिवसेनेचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच माजी सभागृह नेते सुरेश पाटील आणि माजी नगरसेवक बिजू प्रधाने यांनीही घरवापसी केली आहे. आगामी निवडणुकांपूर्वी होत असलेल्या या पक्षबदलांमुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola