Maoist Update : मओवादी पॉलिट ब्युरे मेंबर सोनू उर्फ भूपतीचं 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
Continues below advertisement
माओवादी (Maoist) संघटनेत मोठी वैचारिक फूट पडल्याचे समोर आले असून, पॉलिट ब्युरो (Politburo) आणि केंद्रीय समितीचे सदस्य मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपतीने (Bhupathi) सशस्त्र लढा थांबवण्याची भूमिका घेतली आहे. 'क्रांतिकारी सशस्त्र लढा आता शक्य नसल्याने शस्त्र टाकून जनतेच्या हितासाठी लढणे हाच एकमेव पर्याय आहे', अशी भूमिका भूपतीने मांडली आहे. यानंतर माओवादी नेतृत्वाने भूपतीला गद्दार ठरवले असले तरी, गडचिरोली विभागीय समिती आणि उत्तर बस्तरच्या विभागीय समितीने भूपतीच्या भूमिकेचे समर्थन करणारे पत्रक जारी केले आहे. गेल्या काही वर्षांत सर्वोच्च नेतृत्वासह अनेक बडे नेते मारले गेल्याने आणि जनाधार घटल्याने चळवळ कमजोर झाल्याची कबुली यातून देण्यात आली आहे. या अंतर्गत कलहामुळे माओवादी चळवळ दुभंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement