Silvr Rate : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या दरात 3 हजारांची घसरण
Continues below advertisement
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे, ज्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल ३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. 'जीएसटीसह सोन्याचे दर एक लाख बत्तीस हजार रुपयांवर आले आहेत' आणि यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत ग्राहक खरेदीसाठी गर्दी करतील अशी अपेक्षा ज्वेलर्स व्यक्त करत आहेत. कालपर्यंत विक्रमी उंचीवर पोहोचलेले सोन्याचे दर आज खाली आल्याने दागिन्यांच्या खरेदीला वेग येण्याची शक्यता आहे. २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा भाव सुमारे १,३०,८६० रुपये झाला आहे, तर २२ कॅरेटसाठी हाच दर १,१९,९५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. ही घसरण म्हणजे नफा बुकिंग असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे, मात्र सर्वसामान्यांसाठी ही एक चांगली संधी मानली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement