Ladki Bahin Yojana : '18 नोव्हेंबरपर्यंत e-KYC पूर्ण करा', मंत्री Aditi Tatkare यांचे आवाहन
Continues below advertisement
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) अंमलबजावणीबद्दल महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. 'सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती', असे आवाहन तटकरेंनी केले आहे. योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आजपासून बँक खात्यात मिळण्यास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहे. E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शासनाने https://ladakibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement