Majha Vitthal Majhi Wari 2023 : सोपानकाकांची पालखी ते माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची रांग

Continues below advertisement

रामकृष्णहरी माउली म्या सिद्धेश ताकवले माझा विठ्ठल माझी वारी या कार्यक्रमात आपल्या समद्यांचं स्वागत… 
उठ पंढरीचा राजा..
वाढ वेळ झाला..
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासाठी आला.. 
याचि देही याचि डोळा 
ऐसा देखला सोहळा…
दिवे घाटातून माउलींच्या पालखीचा प्रवास मोठ्या जल्लोषात हरिनामाच्या गजरात सासवडमदी मुक्कामी आला. 
सासवड म्हंजी श्रीसंत सोपान काकांची पावनभूमी.

चला रे वैष्णवहो जाऊ पंढरीयेसी ।
प्रेमामृत खुण मागों त्या विठ्ठलासी ।।१।।

संत सोपान काकांच्या अभंगाच्या या ओळी 
आवं ही वारकरी मंडळी किर्तनात,भजनात समदीजन विठ्ठल नामात एकरुप झालती बगा.. आज माउलींचा मुक्काम सासवडमदी असल्यानं सासवडला मूर्तीमंत उत्साहाचं स्वरुप प्राप्त झालतं. सासवड प्रशासनानं उत्तम व्यवस्था बी केलती..  टाळ मृदुंगाचा गजर अन् ग्यानबा तुकोबांच्या जयघोषात सासवडनगरी दुमदुमुन गेलती बगा…संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं धाकटं बंधू संत सोपानकाकांच्या पालखीचं प्रस्थान झालं बगा..अन् या पालखीचं दर्शन घेन्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी बी केलती बगा…

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram