Majha Vitthal Majhi Waari 2023 : दिव्यांग वारकऱ्यांशी संवाद ते वासुदेवांची वारीतील अनोखी परंपरा

Continues below advertisement

पंढरीचा वारकरी 
वारी चुको न दे हरी

हिच इच्छा मनी बाळगत आणि टाळ मृदुंगाचा गजर करत ह्यो वैष्णवांचा महामेळा पुन्यात दाखल झाला बगा.. पुनं Majha Vitthal Majhi Waari 2023 : दिव्यांग वारकऱ्यांशी संवाद ते वासुदेवांची वारीतील अनोखी परंपराम्हंजी विद्येचं माहेरघर…ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं पुनं शहर.. पुने तिथं काय उने म्हंत्यात त्ये काय खोटं न्हाई.. सांस्कृतिक वारसा जपनारी आनी वारीच्या सेवेत  तसूभरही कमी न पडता अखंड भक्तिसागरात पुनं अक्षरश: न्हाउन निघालं बगा..दोन दिस या दोन्ही पालख्या पुन्यात मुक्कामी हाईती.. ज्या सुखाकारणे देव वेडावला.. वैकुंठी सोडुनी देव संत सदनी राहिला..आता या पालख्या पुन्यातून मार्ग बदलत्यात, अन् या वारीत सगळ्यात अवघड टप्पा आसतो त्यो म्हंजी दिवे घाटाचा… दिवेघाटाचा ह्यो टप्पा उंद्या, ही वारकरी मंडळी पार करनार हाईती….  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram