Majha Vishesh | राम कदमांच्या आंदोलनात काही 'राम' आहे?
पालघर हत्याकांड प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवावा या मागणीसाठी भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबई ते पालघर जनआक्रोश यात्रेचं आयोजन केलं होतं. परंतु, याआधीच भाजप नेते राम कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. आता राम कदम खार पोलीस ठाण्यातून बाहेर आले आहेत. राम कदम यांच्या निवासस्थानापासून यात्रेला सुरुवात होणार होती. यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.