Majha Maharashtra Majha Vision|मराठा आरक्षणाबाबत भाजपप्रणित काही संघटनांकडून मिठाचा खडा: अशोक चव्हाण
Continues below advertisement
मराठा आरक्षणाबाबत अपप्रचार केला जातोय. मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकारचे प्रयत्न थांबलेले नाहीत. कुणाचाही विरोध आरक्षणाला नाही. मराठा आरक्षणाची ही सगळी प्रक्रिया फडणवीसांच्या काळात झाली. आम्ही ती पुढं नेत आहोत. निष्णात वकिलांची फौज आहे. चार वेळा लेखी अर्ज आपण सर्वोच्च न्यायालयात केले आहेत. न्यायालयीन प्रक्रियेत रस्त्यावर येण्यात काही अर्थ नाही, असं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात अशोक चव्हाण (Minister Ashok Chavan) यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन स्पष्ट केलं.
Continues below advertisement