Majha Maharashtra Majha Vision 2020 | ... तर सुप्रिया सुळेच मुख्यमंत्री होतील : चंद्रकांत पाटील
मी स्वत: शरद पवारांवर पीएचडी करतोय. स्वत:भोवती राजकारण फिरवत ठेवण्याचं कौशल्य खरोखर मोठं आहे. पवारांबद्दल मी अनेकदा गौरवोद्वार काढले. शेती, साखर या गोष्टीत त्यांच्याएवढा अभ्यास कुणाचा नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या वक्तव्यावरुन मी पवारांवर ते वक्तव्य केलं. मात्र ते व्यक्तिगत त्यांच्याबाबत नव्हतं, ओव्हरऑल नेत्यांबद्दल होतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP Leader Chandrakant Patil) बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरद पवार साहेबांना राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ आली तर सुप्रिया सुळेंनाच करतील, असं माझं विश्लेषण आहे. ते चुकीचंही नाही. त्यांना त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करावं वाटणं हे चूक नाही, असंही ते म्हणाले. यावेळी 80 तासाच्या सरकारआधी बैठकीत काय घडलं होतं यावर बोलणं चंद्रकांत पाटील यांनी टाळलं. प्रियम गांधी यांच्या पुस्तकाबद्दल ऐकूण आहे, ते पुस्तक वाचण्याची उत्सुकता आहे, असं ते म्हणाले.

#MarathiNews #ABPMajha #ABPMajhaLiveNews