Majha Kutumb Majha Prachar : उमेदावारांच्या खांद्याला खांदा लावत कुटुंबियांचा प्रचार

Continues below advertisement

Majha Kutumb Majha Prachar : उमेदावारांच्या खांद्याला खांदा लावत कुटुंबियांचा प्रचार

यवतमाळ जिल्ह्यातील वणीमधल्या सभेसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरमधून बाहेर पडताच निवडणूक अधिकाऱ्यांकडून त्यांची बॅग तपासण्यात आली आहे. दरम्यान, बॅग तपासताना उद्धव ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांना काही सवाल केले आहेत. 

उद्धव ठाकरे काय काय म्हणाले?

उद्धव ठाकरे निवडणूक अधिकाऱ्यांना म्हणाले, माझी बॅग तपासत आहात, बरोबर आहे. माझ्या अगोदर तुम्ही कोणाची बॅग तपासली? माझा इथे पहिला दौरा आहे. पण माझ्या दौऱ्यापूर्वी कोणत्या राजकीय नेत्याची बॅग तुम्ही तपासली आहे. तुम्ही चार महिन्यात एकाचीही नाही तपासली म्हणत आहात. मीच तुम्हाला पहिल्यांदा सापडलो. माझी बॅग तपासा मी तुम्हाला अडवत नाही. आतापर्यंत तुम्ही मिधेंची बॅग तपासली का? देवेंद्र फडणवीसची बॅग तपासली का? मोदी आणि अमित शाहांची बॅग तपासली का? त्यांनी इथं आले तर त्यांची बॅग तपासल्याचा व्हिडीओ मला पाठवायचा आहे. मोदींची बॅग तपासतानाचा व्हिडीओ मला आला पाहिजे. तिथे तुम्ही शेपूट घालू नका. हा व्हिडीओ मी रिलीज करत आहे. माझं युरीन पॉट पण तपासा. 

Fuel ची टाकी वगैरे काही तपासायची आहे का?

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक कोणत्या शासकीय नोकरीत आहे. हे देखील पाहून घ्या. या बॅगेतील काही पाहिजे असेल तर घ्या. तुम्हालाही तहान लागली असेल. तुम्ही पण माणसं आहात. Fuel ची टाकी वगैरे काही तपासायची आहे का? असा सवालही ठाकरेंनी केला. याशिवाय उद्धव ठाकरेंनी कॅमरामनला प्रश्न केले आहेत. तुम्ही मध्य प्रदेशचे आहात. गुजरातचे तर नाहीत. म्हणजे बॅगा तपासण्यासाठी देखील बाहेरच्या राज्यातील माणसं आहेत, असंही ठाकरे म्हणाले. 

 

 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram