Majha Gav Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा | 18 July 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाघनखं साताऱ्यात दाखल, 19 जुलैला ढोल ताशांच्या गजरात वाघनखांचं स्वागत केलं जाणार, साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयात सातारकरांना वाघ नखं पाहता येणार.
विशाळगडाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा पोलीस दल सतर्क, सोशल मीडियावर अफवा आणि वादग्रस्त मेसेज शेअर करणाऱ्यांवर कारवाईचा सांगली पोलीस अधिक्षकांचा इशारा.
कोल्हापुरात समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडीओ पोस्ट करण्यास बंदी, विशाळगड घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाची खबरदारी.
विशाळगड हिंसाचार प्रकरणी इम्तियाज जलील 19 जुलैला कोल्हापुरात काढत असलेल्या मोर्चाला हिंदु समाजाचा मोर्चा, १९ जुलैलना कोल्हापूर बंदचा हिंदु समाजाचा इशारा.
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली घरांची मोडतोड आणि धार्मिक स्थळांची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा, श्रीरामपूरमध्ये मुस्लीम समाजाची निदर्शनंकरत शासनाकडे कारवाईची मागणी.
येणारी विधानसभा निवडणूक मराठा-विरुद्द ओबीसी अशीच होणार, सांगलीतील मेळाव्यात प्रकाश शेंडगेंचं वक्तव्य.