
Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हा
Majha Gaon Majha Jilha : तुमच्या जिल्ह्यातील बातम्या एका क्लिकवर : माझं गाव माझा जिल्हा
केज तालुक्यात पितृपक्षाच्या जेवणाच्या कार्यक्रमात सुमारे ६० जणांना विषबाधा धारूर आणि अंबाजोगाई येथे रुग्णालयात उपचार सुरू बीडच्या केज तालुक्यातील उंदरी गावात पितृपक्षाच्या कार्यक्रमात अन्नातून ६० जणांना विषबाधा झाली. या सर्वांवर धारुर आणि अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे सध्या सगळीकडे पितृ पंधरवडा कार्यक्रमाचे आयोजन होत आहे. याच पार्श्वभूमीवर केज तालुक्यातील उंदरी येथे भागवत ठोंबरे परिवारात पितृपक्षाचा कार्यक्रम निमित्त संबंधित व कुटुंबातील व्यक्तीसाठी जेवणाचा कार्यक्रम दुपारच्या वेळेमध्ये ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या जेवणातून संध्याकाळी ६० नागरिकांना उलटी, जुलाब आणि चक्कर येणे असा त्रास सुरू झाला. त्या नंतर त्या सर्वांना धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले..